Wednesday, 19 January 2022

गुगल वर्कस्पेसचा प्रभावीपणे वापर कसा करायचा?

गुगल वर्कस्पेसचा प्रभावीपणे वापर कसा करायचा 

याबाबतच्या १० महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्यायलाच हव्या. 


१. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून सहकाऱ्यांसोबत संवाद

जर तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांसोबत एकसारखी गोष्ट वारंवार शेअर करावी लागत असेल, तर प्रत्येकाला प्रत्येकवेळी स्वतंत्रपणे मेल करण्याची किंवा स्वतंत्रपणे सिलेक्ट करण्याची गरज नाही. तुम्ही सहकाऱ्यांचा एक मेल ग्रुप तयार करू शकता. यातून तुम्ही तुमच्या कामाचं वेळापत्रक, ड्राईव्हवरील डॉक्युमेंट्स असं सर्व काही शेअर करू शकता.

हेही वाचा - तुम्हाला WhatsApp ला ब्लॉक केलंय कसं ओळखाल ?

२. सहकाऱ्यांचा किंवा मित्रांसोबतचा वेळ जुळून आणण्यासाठी गुगल कॅलेंडरचा वापर

अनेकदा काही कामाचं नियोजन करायचं असतं किंवा अगदी सहजच एकत्र फिरायला जाण्याचंही नियोजन होतं. मात्र, सर्वांना सोयीची एक वेळ ठरवणं अवघड होऊन बसतं. कारण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कामांच्या तारखा ठरलेल्या असतात. अशावेळी गुगल कॅलेंडर तुम्हाला मदतीचा हात देऊ शकतं. सर्व सहकारी/मित्रांचे गुगल कॅलेंडर एकाचवेळी पाहून तुम्हा सर्वांना सोयीचा मोकळा वेळ सहजपणे शोधता येतो.

३. कोणत्याही कामाबाबत सहकाऱ्यांशी चुटकीसरशी बोला

तुम्ही आणि तुमचे सहकारी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी तुम्हाला एकमेकांसोबत कोणत्याही प्रकल्पाबाबत वेगवेगळे विचार शेअर करता येतील. यासाठी तुम्ही जीमेल चॅट बॉक्सचा वापर करू शकता.

हेही वाचा - गुगल फोटो एक्स्पोर्ट करण्यासाठी गुगलचे नवे टूल

४. महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, फाईन सुरक्षितपणे सहकाऱ्यांसोबत शेअर करा

एखाद्या प्रकल्पावर काम करत असाल आणि एकमेकांचे महत्त्वाचे फाईल आपोआप एकमेकांना उपलब्ध व्हावेत असं वाटत असेल तर तुम्ही गुगल ड्राईव्हमधील फोल्डरचा प्रभावी वापर करू शकता. यात तुम्ही तुमच्या प्रकल्पाच्या नावाने फोल्डर तयार करून त्याचा एक्सेस सर्व सहकाऱ्यांना देऊ शकता. यामुळे तुम्हाला प्रत्येकाला स्वतंत्रपणे ते शेअर करण्याची गरज राहत नाही.

५. प्रकल्पाचं वेळापत्रक आणि ऐनवेळच्या डेडलाईन पाळण्यासाठी गुगल शिट्सचा उपयोग

अनेकदा मोठ्या प्रकल्पाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या सहकाऱ्यांकडे दिलेल्या असतात. त्या प्रत्येकाचं किती काम झालं आणि एकूण प्रकल्प किती बाकी आहे हे समजणं अनेकदा जिकिरीचं होतं. यावर उपाय म्हणून तुम्ही गुगल शिट्सचा वापर करू शकता. त्याचा एक्सेस सर्वांना देऊन प्रत्येकाने त्यात आपल्या कामाच्या अपडेट्स टाकल्यास एकाच वेळी सर्वांना एकमेकांच्या कामाचा अंदाज येईल. याशिवाय ऐनवेळच्या डेडलाईनचंही नियोजन करता येईल.

हेही वाचा -  काय आहे गूगल चॅट

६. सहकाऱ्यांसोबत सहजपणे व्हिडीओ मिटिंग आयोजित करा

प्रत्यक्ष भेटणं शक्य नसलं तरी तुम्ही गुगल मिटचा उपयोग करून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून एकमेकांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलू शकता.

७. रिअल टाईममध्ये डॉक्युमेंट संपादित करा

कोणत्याही प्रकल्पावरील कामाच्यावेळी तुम्हाला सहकाऱ्यांना मेल करून स्वतंत्रपणे डॉक्युमेंट, पीपीटी, स्लाईड पाठवण्याची गरज नाही. तुम्ही एकाच जागेवर एडिट करून त्याला अंतिम रूप देऊ शकता.

हेही वाचा -  गुगल फोटो एक्स्पोर्ट करण्यासाठी गुगलचे नवे टूल

८. ऑनलाईन प्रेझेंटेशन द्या

तुम्हाला प्रेझेंटेशन देण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. गुगल मिटवरच तुम्ही तुमच्या स्लाईड दाखवू शकता. याशिवाय तुम्ही संबंधित बैठक रेकॉर्ड देखील करू शकता. जेणेकरून ही बैठक नंतर पाहता येईल. याशिवाय तुम्ही बैठकीला कॅप्शन ऑन करू शकता.

९. मोठ्या सहकाऱ्यांच्या समुहासोबत माहितीचं आदानप्रधान

तुम्ही मोठ्या सहकाऱ्यांच्या समुहासोबत माहितीचं आदानप्रधान करू शकता. यासाठी तुम्ही साईट देखील तयार करू शकता.

१०. चुटकीसरशी ग्राहकांची माहिती जमा करा

तुम्ही गुगल फॉर्मचा वापर करून चुटकीसरशी तुमच्या ग्राहकांची माहिती मिळवू शकता. गुगल फॉर्मच्या मदतीने तुम्ही सर्वेक्षण देखील करू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी https://rb.gy/mdfk4d या लिंकवर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
sites.google.com/view/vikasagawane

संदर्भ - https://www.loksatta.com/techit/important-simple-10-tips-for-using-google-workspace-effectively-pbs-91-2757202/

Tuesday, 18 January 2022

का गरजेचा आहे युनिव्हर्सल पास ? घरबसल्या काढता येणार युनिव्हर्सल पास

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसने (Corona virus) संपूर्ण जगाला वेठीस धरलंय. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच कोरोना व्हायरसचा 'ओमिक्रॉन' (Omicron) हा नवा व्हेरिएंट सापडलाय. त्यामुळे जगभरात विशेष काळजी घेतली जात आहे.


 

कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी युनिव्हर्सल पास सक्तीचा करण्यात आला आहे.

·        युनिव्हर्सल पास कोठे वापरू शकतो

1.     सार्वजनिक वाहतूक,

2.     रेल्वे (Universal Pass Local Train),

3.     खासगी बस सुविधा,

4.     विमाने यांतून प्रवास करताना

5.     तसेच मॉल,

6.     सिनेमागृहे,

7.     नाटय़गृहे

 हेही वाचा -  मोबाईलच्या व्यसनातून बाहेर कसे पडाल ? 



ज्या व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा व्यक्तींनाच युनिव्हर्सल पास मिळणार आहे. हा पास ऑनलाइन पद्धतीने सहजपणे मिळवता येतो. 


   हेही वाचा -   गुगल फोटो एक्स्पोर्ट करण्यासाठी गुगलचे नवे टूल


·        युनिव्हर्सल पास कसा मिळवायचा

 

1.     सुरुवातीलाhttp://epassmsdma.mahait.org या वेबसाईटवर जा.

2.     त्यानंतर तुम्हाला citizens हा पर्याय निवडा.


3.     आता ‘universal pass for double vaccinated citizens’ या पर्यायावर क्लिक करा.

4.     त्यानंतर आपण कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करताना जो मोबाईल क्रमांक नमूद केलेला आहे, तो क्रमांक दिलेल्या पर्यायात टाकावा.

       हेही वाचा -  काय आहे गूगल चॅट

5.     त्यानंतर तत्काळ या रजिस्टर मोबाईलवर ओटीपी अर्थात One Time Password एसएमएसद्वारे प्राप्त होईल.

6.     हा ओटीपी नमूद केल्यावर तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल क्रमांक समोर दिसेल.


7.     सर्व तपशील योग्य असल्याची खात्री झाल्यावर जनरेट पास (Genrate Pass) या पर्यायावर क्लिक करा.

8.     आता तुमच्या दोन्ही कोविड लसींचा तपशील (लस घेतल्याची तारीख, वेळ) तुम्हाला दिसेल.

9.     तिथे सेल्फ इमेज Self image हा पर्याय असेल. तिथे तुम्ही स्वतःचा सेल्फी किंवा गॅलरीतून एखादा फोटो अपलोड करू शकता.


10.  हे सर्व झाल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ई-पास जनरेट झाल्याचा एसएमएस येईल.

11.  या मॅसेजमधील लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा युनिव्हर्सल पास डाऊनलोड करू शकता. 


संदर्भ - https://www.esakal.com/desh/how-to-get-a-universal-pass-ss01

 

Google सर्च करतांना वापरा या सोप्या टिप्स

Google हे जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे, जे आजच्या काळात सर्चची गरज बनले आहे. आता Google हा शब्द केवळ एक शब्दच नाही. अनेक वर्षांपासू...